
पुणे : राज्यात मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. तर पुढील पाच दिवस कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी राहणार आहे. तर पुण्याच्या घाट विभागात जोरदार ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मोसमी पावसाचा आस हा उत्तरेकडे सरकला आहे. परिणामी राज्यावर कुठलीही यंत्रांना कार्यान्वित नाही. यामुळे पुढील ३ दिवसांत राज्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुढील २ दिवस तुरळक ठिकाणी तर पुढील ३ दिवस काही ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पुढील पाचही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात आज देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असून ही अवस्था पुढील पाच दिवस राहणार आहे.
मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगटासह होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगटासह होण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवार, २५ ऑगस्टपासून कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे निघून गेले आहे.
राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट वाढली आहे. जुलै महिन्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात पहिले १५ दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, १७ तारखेपासून पावसाने पुनरागमन केले. मात्र काही दिवसच ही स्थिती राहिली. दरम्यान, राज्यावर मॉन्सूंनची कोणतीही प्रक्रिया कार्यान्वित नसून पावसाचा जोर ओसरणार आहे.
राज्यात जवळपास ९६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पिकांच्या पोषणासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. मात्र, राज्यात पावसाचा जोर ओसरला असून ही पिके संकटात सापडल्याने बळीराजा चिंतेत आहे.
संबंधित बातम्या
