
Maharashtra weather update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टायामुळे राज्यातील वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहे. सध्या राज्यातील वातावरण कोरडे असून पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात मोठ्या प्रमाणात थंडी वाढणार आहे, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. २३ नोव्हेंबर पर्यंत तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार आहे. तर देशात काही ठिकाणी पाऊस देखील बरसणार आहे.
राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. २३ नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेनं येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होणार आहे. तर २४ नोव्हेंबरला दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. सध्या मध्य महाराष्ट्रासह राज्यात इतर भागात गारठा वाढला आहे. मराठवाडा, विदर्भात पारा खालवला आहे.
मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीसह गोव्यात गारठा वाढला आहे. छत्तीसगड, तेलंगणा, रायलसीमा, किनारपट्टी आंध्र प्रदेश तसेच अरुणाचल प्रदेशात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान थोडे वाढलेले आहे. तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकमध्ये काही ठिकाणी तसेच जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, कोकण आणि गोवा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल, केरळ, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथील तापमानात देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
संबंधित बातम्या
