Maharashtra winter Weather Forecast : राज्यात पुढील तीन दिवस तापमाणात मोठी घट होणार आहे. सध्या राज्यात कोरडे वातावरण असून परिणामी गारठा वाढणार आहे. सध्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणसह विदर्भात कोरडं वातावरण राहणार असून यामुळे पहाटे आणि रात्रीच्या तापमानात घट होणार आहे. तर, दुपारी तापमानात किंचित वाढ होऊन हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात सध्या कोरडे वातावरण आहे. यामुळे पुढील तीन दिवस राज्याच्या काही जिल्ह्यात किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पुढील तीन दिवस तापमान हे दोन ते तीन अंशाने कमी होणार आहे.
राज्यात गुरुवार पासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होणार असून क्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहनर आहे. तर २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात गुलाबी पहाट होत असून काही ठिकाणी दाट धुके पडण्याची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.