पुणे : कमी दाबाचा पट्टा हा आग्नेय राजस्थान आणि मध्य प्रदेशाकडे सक्रिय झाले आहे. हा पट्टा राज्यापासून दूर जात असल्याने राज्यात पावसाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. मात्र, अरबी समुद्रातून येणारे वारे हे तीव्र आहे. मॉन्सून द्रोणीका ही दक्षिणेकडे तीव्र झाली आहे. यामुळे गोवा आणि कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे. या सोबतच आज मुंबईसह पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा तुरळक प्रमाणात का होईना हजेरी लावली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासूंन राज्याच्या काही भागात चांगला पाऊस होत आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर हा अधिक होता. मात्र, पावसाचा जोर ओसारणार आहे. कमी दाबाचा पट्टा हा आग्नेय राजस्थान आणि मध्य प्रदेशाकडे सक्रिय झाले आहे. हा पट्टा राज्यापासून दूर जात असल्याने राज्यात पावसाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे.
मध्य महाराराष्ट्रांत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत: नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात पावसाची शक्यता आहे. पुण्यात आज वातावरण सामन्यात: ढगाळ राहणार असून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाटात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून दुपार नंतर सामन्यात: हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरला २० आणि २१ ला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात पावसाचा वेग जास्त राहणार आहे.
मुंबईत देखील आज काही भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसाचा वेग वाढणार असून यामुळे मुंबईकरांना वाढत्या उकड्यापासून दिलासा मिळणार आहे. पावसामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत विघ्न येण्याची शक्यता आहे.
पुण्यात देखील काल सकाळपासून हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. सकाळी आणि दुपारी पावसामुळे गणपती खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. आज देखील पुण्यात ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.