Maharashtra weather update : एककिडे उत्तर भारत थंडीनं गारठला असतांना राज्यात, अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज व उद्या मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगढ आणि राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार एक पश्चिमी विक्षोभ हळूहळू वायव्य भारताच्या दिशेने सरकत आहे. तसेच साउथ ईस्टर्ली अथवा साऊथ साऊथ ईस्टर्ली वारे दक्षिण पेनिन्सुलावरुन राज्याच्या दिशेने येत आहेत. विंड इंटरअॅक्शनमुळे महाराष्ट्रासह भारताच्या नॉर्थ वेस्ट सेंट्रलच्या हवामानावर प्रभाव करणार आहे. यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात आज व उद्या मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात ९ तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात तापमानात घट होऊन दिवसाही गारठा जाणवणार आहे. हवेतील आद्रतेमुळे वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात आकाश अंशता ढगाळ राहून आज व उद्या मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळ ठिकाणी अति हलका ते हलक्या पावसाची शक्यता आहे. १० तारखेला पावसाचे प्रमाण कमी होऊन ११ तारखेपासून आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात हळूहळू ३ ते ४ डिग्री सेल्सियस पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ८ ते १० तारखेच्या सुमारास साधारण २ डिग्री सेल्सियस पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. पुढील ७२ तास पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या