Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. थंडी सोबत आता पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने विदर्भात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते टिंन दिवस धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट विभाग, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडील सीमेपलीकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग काहीसा मंदावला आहे. तर उत्तरी पर्वतीय क्षेत्रामध्येही गारठा कमी झाला आहे. हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड या भागांमध्ये सध्या डोंगराळ क्षेत्र वगळता मैदानी भागामध्ये किमान तापमानाच वाढ झाली आहे. त्यामुळे याच परिमाण राज्याच्या हवामानावर दिसून येत आहे.
राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर राज्यात बहुतांश जिल्ह्यात आज पासून पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २६, २७, २८ डिसेंबरला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्चना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात २७ डिसेंबरला अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वर्धा वाशिम जिल्ह्यामध्ये २७ डिसेंबरला व अमरावती गोंदिया व नागपूरला २८ डिसेंबरला तुरळक ठिकाणी मेघ गर्जना व वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात आज आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे तर उद्या आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी संध्याकाळी आकाश सामान्य ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या