Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे थंडीने गारठले आहेत. काही जिल्ह्यात कमाल तापमान हे १० डिग्री अंश सेल्सिअस पेक्षाही कमी झाले आहेत. तर पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत थंडीचा जोर फारसा कमी होणार नाही मात्र, काही दिवसांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेला थंडीचा कडाका शनिवार व रविवारनंतर थोडा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कोरडे व थंड वारे वाहू लागले असून याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्हे थंडीने गारठले आहेत. तर पूर्वेकडील वाऱ्यांचे वर्चस्व येत्या दोन दिवसात कमी होणार असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या दोन दिवसात तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. पुण्याचे किमान तापमान रविवारी १२ अंश सेल्सिअसवरून मंगळवारपर्यंत १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे. तर राज्यात शुक्रवारी सर्वाधिक कमी तापमान जळगावमध्ये नोंदवल्या गेले. येथे ८.९ अंश असेल्सिअस तापणाची नोंद झाली.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार सध्या लक्षद्वीप आणि त्याला जोडूनच मालदीव परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासात चक्राकार वाऱ्यांची स्थिती बदलणार असून कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होणार आहे. महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नसून त्यानंतर दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ ते १९ डिसेंबर या दरम्यान आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी दुके पडण्याची शक्यता आहे. किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी, धुळ्यात राज्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान 6 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम असला तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. वाऱ्यांमुळे दिवसा थंडी जाणवत आहे. तर, संध्याकाळी तापमानाचा पारा घसरत असल्याने गारठ्यात वाढ होत आहे. धुळे, परभणी, गडचिरोली आदी ठिकाणी किमान तापमान कमी झाल्याचे नोंदवले गेले.
मुंबईत देखील तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळ मुंबईचे तापमान घसरले आहे. सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता. सोमवारी १३.७ अंशांवर असलेला तापमानाचा पारा थोडा वाढला आहे. तर पुढील पाच दिवस थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.