Weather Update: पुढील ३ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; पुणे व साताऱ्यासाठी रेड अलर्ट, पुण्यातील धरणांतून विसर्ग वाढवला-maharashtra weather update imd alert heavy rain likely in next 3 to 4 hours in pune and satara district ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update: पुढील ३ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; पुणे व साताऱ्यासाठी रेड अलर्ट, पुण्यातील धरणांतून विसर्ग वाढवला

Weather Update: पुढील ३ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; पुणे व साताऱ्यासाठी रेड अलर्ट, पुण्यातील धरणांतून विसर्ग वाढवला

Aug 24, 2024 04:51 PM IST

Maharashtra weather update : येत्या ३ ते ४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील ३ तासांत मुसळधार पावसाची शक्यता (file pic)
पुढील ३ तासांत मुसळधार पावसाची शक्यता (file pic)

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. येत्या ३ ते ४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाजवर्तवण्यात आला आहे तर पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संभाजीनगर, जालना, अकोला आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  त्याचबरोबर अहमदनगर,जळगाव आणि कोल्हापूरमध्येही अतिवृष्टीचा अंदाज असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना रेड अलर्टदेण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड व विदर्भातील अकोला, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामानविभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतही पावसाचा जोर वाढणार आहे. आज पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

उजनी, पाणशेत, खडकवासलातून विसर्ग वाढवला–

उजनी धरणात शनिवारी (२४ ऑगस्ट) रोजी दुपारी २ वाजता पाणीसाठी १०६.२५ टक्के इतका झाला आहे. धरणाऱ्या पाटलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून दौंड येथे ९००० क्युसेक्स इतका विसर्ग असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी साठ्यामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजल्यापासून उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीत पूर नियंत्रणासाठी २००० क्यूसेक्स वरून ३००० क्यूसेक्स इतका विसर्ग वाढण्यात येत आहे. नदीतील एकूण विसर्ग साडवा ३००० क्यूसेक्स व विद्यूत गृह १६०० क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीत राहणार आहे. त्याचबरोबर पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्ग कमी-जास्त राहणार आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १२९५८ क्युसेक्स विसर्ग वाढवून दुपारी ४ वाजता १९११८ क्यूसेक्स करण्यात येत आहे.

वरसगाव धरणाच्या ३६६२ क्यूसेक विसर्ग वाढ करून सांडवाद्वारे ८४२५ क्यूसेक विसर्ग व ६०० क्यूसेक विद्युत गृह निर्मिती द्वारे असा एकूण ९०२५ क्यूसेक विसर्ग चालू करण्यात येत आहे.

 

पानशेत धरणाच्या ३९९६ क्यूसेक विसर्गवाढ करून सांडवाद्वारे ८३२० क्यूसेक विसर्ग व ६०० क्यूसेक विद्युत गृह निर्मिती द्वारे असा एकूण ८९२० क्यूसेक विसर्ग चालू करण्यात येत आहे.