Maharashtra weather update : राज्यात गेल्या दोन दिवसांपासूंन अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील राज्यात काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सोबतच राज्यातील तापमानात तब्बल २ ते ३ डिग्री सेल्सिअसने घट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागणे दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यावर एक कमी दाबाची द्रोणीय रेषा आग्नेय अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात पर्यंत आहे. पश्चिमी विक्षोभ हरियाणावर आहे. त्यामुळे आर्द्रते बरोबर थंड वारे व दक्षिण द्वीपकल्प पासून आग्नेय वारे व गरम वारे यांचा परिणाम पश्चिम मध्य भारत व महाराष्ट्रावर होत आहे. आज महाराष्ट्रात ही वार्यांची परस्परिया प्रभाव कारक आहे.
यामुळे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील ४८ तासात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात किमान तापमान विशेषतः उत्तर मध्य भागात व विदर्भात हळूहळू कमी होईल पुढील चार-पाच दिवसात जवळजवळ तीन ते चार डिग्री सेल्सियसने तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात येथे ४८ तासात अंशतः ढगाळ वातावरणाबरोबर तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहाटे धुके देखील पडण्याची शक्यता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे येथे किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात कमाल तापमानात सुद्धा घट झाल्यामुळे दिवसादेखील थंडी जाणवणार आहे.
दरम्यान, काल सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई, सातारा, अहमदनगर जिल्ह्यात काही भगात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांवर गंभीर परिमाण होणार आहे. काजू, आणि आंबा बागांना याचा फटका बसला. आज देखील पावसाचे सावट असल्याने याचा पिकांवर गंभीर परिमाण होणार आहे. आजही राज्यात या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार, पुढील २४ तासात दक्षिणेकडील किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर तामिळनाडू आणि केरळच्या अंतर्गत भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याच बरोबर कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडू शकतो.
संबंधित बातम्या