Maharashtra Weather Update : मुंबई, ठाणे, पालघरवरील संकट कायम! राज्यात आजही वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : मुंबई, ठाणे, पालघरवरील संकट कायम! राज्यात आजही वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

Maharashtra Weather Update : मुंबई, ठाणे, पालघरवरील संकट कायम! राज्यात आजही वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

May 14, 2024 06:38 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला. मुंबई, पुणे,सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. आज देखील राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यात वादळी पावसाची व गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यात वादळी पावसाची व गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यात वादळी पावसाची व गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (HT)

Maharashtra Weather Update : राज्यात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला. मुंबई, पुणे,सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मुंबईत धुळीच्या वादळासोबत, सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे ८ जणांचा बळी गेला. मुंबई, ठाणे पालघरला आज दुहेरी इशारा आहे. मुंबई, पालघर येथे आज दुपारी उष्ण व दमट हवामान राहणार असून संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सोबतच राज्याच्या सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामानाचा अंदाज वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीय रेषा दक्षिण अंतर्गत कर्नाटक पासून वायव मध्य प्रदेश पर्यंत मध्य महाराष्ट्र मार्गे जात आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भाच्या काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १४ मे पासून १७ मे पर्यंत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, नाशिक, अहमदनगर, सांगली तर मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित जिल्ह्यात मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Lok sabha Poll 2024 : महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात ५९.५१ टक्के मतदान, मावळमध्ये फेरमतदानाची मागणी!

मुंबई, पालघरमध्ये उष्ण व दमट हवमानासोबत पावसाचा इशारा

१४ मे रोजी पालघर व ठाणे येथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये उष्ण व दमट हवमान राहण्याची शक्यता आहे. कोकण व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव व मराठवाड्यातील मराठवाड्यातील परभणी हिंगोली व नांदेड वगळता इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Sushil Modi : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मध्य, महाराष्ट्र मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. १५ व १६ मे रोजी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर १५ मे रोजी कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. १७ मे रोजी विदर्भातील काही तर मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यामध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

पुण्यात आज हलका ते मध्यम पावसाची शक्यता

पुणे शहर व परिसरात आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशता ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर