Maharashtra weather update : दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तर कोकणापासून पुढे उत्तरेकडे एक द्रोणीका का रेषा देखील तयार झाली आहे. यामुळे आद्रतेत वाढ झाली आहे. यामुळे ४ ते ६ तारखे दरम्यान, राज्यातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात अवकळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे. दरम्यान, उत्तर भरातात थंडीची लाट कायम आहे. थंडीमुळे उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर काही राज्यात पावसाचा देखील इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तर कोकणापासून पुढे उत्तरेकडे एक द्रोणीका का रेषा देखील तयार झाली आहे. पश्चिमी विक्षोभ जम्मू आणि लगतच्या उत्तर पाकिस्तानावर स्थित आहे. त्याच्या प्रभावामुळे हवेच्या वरील स्तरात एक चक्रीय स्थिती दक्षिण हरियाणा आणि लगतच्या परिसरात तयार झाली आहे. साऊथ ईस्टर्ली वाऱ्यांमुळे राज्यात विशेषतः कोकणकोवा आणि मध्य महाराष्ट्रात आद्रता वाढणार आहे. त्यामुळे कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही दिवस ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी अति हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुख्यतः धुळे आणि जळगाव जिल्ह्यात ४ आणि ५ तारखेला तर ६ तारखेला नंदुरबार येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. ५ तारखेपर्यंत किमान तापमानात १ ते २ डिग्री सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज आहे. सहा तारखेनंतर ८ ते ९ तारखेपर्यंत दीड ते दोन डिग्री सेल्सियसने तापमान कमी होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात साधारण ३ डिग्री सेल्सिअस पर्यंतकमी होण्याचा अंदाज आहे.
पुण्यात पुढील तीन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तसेच सकाळी हलके धुके पडण्याचीही शक्यता आहे. ६ तारखेनंतर ढगाळ वातावरणात थोडीशी वाढ होईल. तुरळक ठिकाणी अति हलक्या पावसाची शक्यता आहे. ९ तारखेनंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि थंडीची लाट असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेऊन, इंटरमिजिएट (यूपी बोर्ड, सीबीएसई, सीआयएससीई, मदरसा आणि संस्कृत बोर्ड) पर्यंतच्या सर्व बोर्डांच्या शाळा बंद. शनिवार पासून काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रयागराजमधील जिल्हा शाळा निरीक्षक पीएन सिंह यांनी बुधवारी हा आदेश जारी केला. तर गोरखपूरचे डीएम कृष्णा करुणेश यांनी सांगितले की, थंडीत विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता जिल्ह्यातील १२वीपर्यंतच्या सर्व शाळांमध्ये ६ जानेवारीपर्यंत अभ्यास बंद राहणार आहेत.
संबंधित बातम्या