Maharashtra Weather update: राज्यात थंडी पावसाचा खेळ! तापमानात होणार मोठी घट; असे असेल हवामान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather update: राज्यात थंडी पावसाचा खेळ! तापमानात होणार मोठी घट; असे असेल हवामान

Maharashtra Weather update: राज्यात थंडी पावसाचा खेळ! तापमानात होणार मोठी घट; असे असेल हवामान

Feb 04, 2024 08:18 AM IST

Maharashtra Weather update: राज्यावर वेस्टर्न डिस्टर्बंन्समुळे वातावरणात मोठे बदल होत आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुढील काही दिवस तापमानत मोठी घट होणार आहे.

Winter Season In Maharashtra
Winter Season In Maharashtra (HT)

Maharashtra Weather update: एक वेस्टर्न डिस्टर्बंन्स म्हणजे पश्चिमी विक्षोभ आता ईशान्येकडे जात आहे. तसेच एक जेट्स स्ट्रीम म्हणजे जोरदार थंड हवा उत्तर भारतावर आहे. यामुळे पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असून तापमानात चार ते पाच डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी वाढणार आहे. उत्तर भारतात देखील थंडीची लाट कायम असून काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह मुंबई, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात थंडी कायम आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Pune Lonavala Railwayblock : पुणे-लोणावळा मार्गावर आज रेल्वेचा मेगा ब्लॉक! ‘या’ लोकल रद्द, वाचा

एक वेस्टर्न डिस्टर्बंन्स म्हणजे पश्चिमी विक्षोभ आता ईशान्येकडे जात आहे. तसेच एक जेट्स स्ट्रीम म्हणजे जोरदार थंड हवा उत्तर भारतावर आहे. वाऱ्याची प्रभावी चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थान व लगतच्या पाकिस्तानवर आहे. त्यामुळे राज्यांमध्ये पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहणार आहे. यामुळे २४ तासानंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पाच तारखेच्या सकाळनंतर किमान तापमान जवळजवळ चार डिग्री सेल्सिअसणे घट होण्याची शक्यता आहे. तसेच पाच तारखेनंतर आकाश निरभ्र राहणार आहे. उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात चार डिग्री सेल्सिअसणे घट होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील दोन दिवस तापमान कमीच राहणार आहे. तर, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर औरंगाबादला पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तसेच हलके धुके पडण्याची शक्यता आहे. तापमानत अंदाजे चार डिग्रीने घट होण्याचा अंदाज आहे. पाच, सहा व सात फेब्रुवारीला कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. देशात उत्तरेत थंडीचा कडाका कायम आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरात हा पाऊस होणार आहे. तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर येथे काही भागात हीमवृष्टि होणार असल्याचा अंदाज आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर