पुणे : बंगालच्या उपसगरावर असलेल्या कमी दाबचा पट्टा पुढील पाच दिवस राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, अरबी समुद्रातून येणारे पश्चिमी वारे तीव्र आहेत. पुढील ७२ तासांत त्यांच्या वेग कायम राहणार असल्याने कोकण आणि गोव्यात पुढील तीन ते चार दिवस बहुतांश ठिकाणी मुळसाधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकण गोव्यात पुढील तीन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २१ आणि २२ सप्टेंबरला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २०, २१, २२ सप्टेंबरला विरदर्भात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना आणि वीजांच्या कटकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्यात आज हवामान सामान्यत: ढगाळ राहणार आहे. तर शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत देखील आज बाप्पाच्या आगमन हे हलक्या सरींमद्धे होण्याची शक्यता आहे. मुंबईत बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात बऱ्याच भागात उन पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसा उन आणि रात्री पाऊस असा खेळ सुरू आहे. उष्णतामान वाढल्याने रोगराई देखील वाढली आहे. संमिश्र वातावरणामुळे पिकांवर रोगराई पडण्याची शक्यता आहे.