Maharashtra Weather Update : राज्यात आज काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांत देखील मध्यम पावसासह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर .ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र गुजरात स्टेट व मध्य प्रदेशचा आणखी काही भागात व आग्नेय राजस्थान काही भागात आज २६ रोजी दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र गुजरात स्टेट व मध्य प्रदेश छत्तीसगड वेस्ट बंगाल झारखंड व बिहारच्या उर्वरित भागात राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तर हरियाणाच्या काही भागात मान्सून पुढील तीन ते चार दिवसात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
कोकणात आज २६ जून ला, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ जून रोजी, रत्नागिरी रायगडला २८ जून रोजी तुरळक ठिकाणी मुळसाधार ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पुढील पाच दिवस मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात आज धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे कोल्हापूर व सातारा जिल्ह्यामध्ये व सातारा जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात आज पासून पुढील पाच दिवस मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
पुणे व परिसरात आज आकाश सामान्यत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या हलक्या ते मध्यम अशा काही सरी पडण्याची शक्यता आहे. २८ जूनला आकाश सामान्यत: ढगाळ राहून आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.