Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आता गारठा वाढला आहे. जळगाव, पुणे, सांगली, नागपूर, नाशिक आदि जिल्ह्यात तापमान घसरले आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यात सकाळी आणि रात्री मोठी थंडी जाणवू लागली आहे. गुरूवारी सकाळी पुण्यात १५.२ अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले. तर सांगलीत सर्वाधिक राज्यात सर्वात कमी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर तामिळनाडू व केरळच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व राजस्थान भागात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट झाली आहे. यासह जम्मू, काश्मीर, लडाख, बाल्टीस्तान, मुजफ्फराबादम, राजस्थान मध्ये तापमानात फारसा बदल झालेला नाही.
राज्यात ऑक्टोबर महिन्यात उकाडा वाढला होता. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे थंडी कधी पडणार असा प्रश्न सर्वांना पडत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील नाशिकमध्ये नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. नाशिकमध्ये १४.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंदवल्या गेले. तर सांगली येथेही १४.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यामध्ये गुरूवारी (दि.७) तापमानात मोठी घट पाहायला मिळाली. सर्वाधिक कमी तापमान शिवाजी नगर, एनडीए येथे नोंदवले गेले. शिवाजीनगर येथे १५.२ अंश सेल्सिअस तर हवेली येथे १३.४, आणि एनडीए येथे १३.७ तापमानाची नोंद झाली. तर आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे १४.७ किमान तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान हे वडगावशेरीतत नोंदवलय गेले. येथी २१.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मगरपट्टा २०.३ व कोरेगाव पार्कमध्ये १९.३ तापमानाची नोंद झाली.
पुणे : १५.२, जळगाव : १५.८, महाबळेश्वर : १५.६, मालेगाव : १७.८, सातारा : १६.६, परभणी : १८.३, नागपूर : १८.६ सांगली : १४.४, अहिल्यानगर : १४.७