Maharashtra Weather Update : राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई, पुण्यात सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. तर कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे नद्या या दुथड्या भरून वाहत होत्या. दरम्यान, आज देखील कोकणात, मध्य महाराष्ट्रात व विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज बुधवारी, रायगड, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पूर्व मध्य प्रदेश व लगतच्या छत्तीसगडला असलेले कमी दाबाचे क्षेत्र नाहीसे झालेले आहे. समुद्रसपाटीवरील दक्षिण गुजरात ते उत्तर कर्नाटक किनारपट्टी लगत असलेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे आज कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज रायगड व सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार म्हणजेच २४ तासात ११६ ते २०४ मीटर तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजेच २४ तासात २०४ मिलिमीटर पेक्षा जास्त तर रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरी; सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर तर कोल्हापूर व नाशिकच्या घाट विभागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात देखील अतिमुळसाधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर व नाशिकच्या घाट विभागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ५ जुलै रोजी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर सातारच्या घाट विभागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरी सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात पुढील पाच दिवस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील बऱ्याच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना जोरदार ते खूप जोरदार पाऊस तर धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज उत्तर महाराष्ट्र तर उद्या २५ जुलै रोजी पालघर ठाणे व पुणे जिल्ह्याच्या घाट भागात २६ व २७ जुलै रोजी कोकण तर पुणे व सातारच्या घाट विभागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरी सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे व परिसरात आज वातावरण संपूर्ण ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सतत धार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहून अधून मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर आज व उद्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.