Maharashtra weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या २४ तासांपासून राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात मध्यम पाऊस झाला आहे. हवामान विभागाने बुधवार पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून ते ३ जुलै या चार दिवसांत पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी वारे हे सध्या पूर्व उत्तर प्रदेशच्या उर्वरित भागात, पश्चिम उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, पश्चिम राजस्थान, हरियाणा, चंदिगड, पंजाब व आणखी काही भागात तर पश्चिम उत्तर प्रदेशच्या उर्वरित भाग, हिमाचल प्रदेश व जम्मूच्या भागात पुढील दोन दिवसांत पुढे वाटचाल करण्यास वातावरण अनुकूल आहे. सध्या मॉन्सूनने देशाचा ९५ टक्के भाग व्यापला आहे.
कमी दाबाचे कमी दाबाचे क्षेत्र हे आज वायव्य बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिसाच्या गंगेटी समुद्रकिनारपट्टी लगत आहे. समुद्रसपाटीवरील कमी दाबाची दोन्ही रेखा ही दक्षिण महाराष्ट्र ते मध्यम केरळ दरम्यान सक्रिय असल्याने कोकणात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आज उद्या काही ठिकाणी, ३० जून ते १ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उद्यापासून पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी विदर्भात, तर राज्याच्या बहुतांश भागात आज ३० ते ते २ जुलै दरम्यान बऱ्याच भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० जून व १ जुलै दरम्यान रायगड, रत्नागिरी, पुणे तर १ जुलैरोजी सिंधुदुर्ग व २ जुलै रोजी पुणे येथे घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ३० ते 3 जुलै दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना गर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
३० जून रोजी पालघर वगळता कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ३० जून ते ३ जुलै दरम्यान पालघर ठाणे, सिंधुदुर्ग तर ३० जून ते तीन जुलै दरम्यान सातारा तर १ ते ३ जुलै दरम्यान नाशिक जिल्ह्यात घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे शहर व परिसरात आज आणि उद्या आकाश सामान्यत: ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर १ जुलैनंतर आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह संततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात आज तुरळक ठिकाणी मुसळधार व त्यानंतर उद्यापासून पुढील चारही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज घाट विभागात यलो अलर्ट तर पुढील पचारी दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.