Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांनपासून थंडी वाढली आहे. वातावरणात मोठा बदल झाला आहे. काही शहरांचा पारा हा कमालीचा कमी झाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर सोबत पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती तयार झाली असून यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल व चेन्नईकडे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिणाम पुढचे तीन दिवस अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील किनारपट्टी जवळील गावांवर याच परिमाण होण्याची शक्यता आहे. विशेषता: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
प्रामुख्याने १४ आणि १५ तारखेला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यानंतर तापमानात मोठी घट होण्याची शक्यता देखील हवामान विभगणे वर्तवली आहे.
सध्या मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईत सकाळच्या सुमारास गारवा जाणवत असून पुढील २ दिवसात आणखी तापमान कमी होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. तर काही ठिकाणी सकाळी धुके आणि थंडी तर काही ठिकाणी दमट वातावरण नागरिक अनुभवत आहेत.
पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावर १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगलीतही २ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्त्या आहे. तर लातूर-धाराशीव, सोलापूरमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर व घाटमाथ्यावर आज व उद्या हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात दिवसभर उष्णता आणि रात्री गारठा तर सकाळी धुके असे बहुतांश ठिकाणी वातावरण आहे.