Maharashtra Weather Update : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: कोकणात, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. त्यामुळे येथील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच नदीपत्रापासून दूर राहा असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड तर अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, इतर ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, पुणे, सातारा, जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कही जिल्हे वगळता राज्यात इतर ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या महितीनुसार आज उत्तर झारखंड व लगतच्या भागावर अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र असून ते वायव्य दिशेला सरकत आहे. तसेच समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी पर्यंत सक्रिय आहे. कोकण, गोव्यात पुढील पाच ते सात दिवस तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक ४ रोजी साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहराच्या घाट विभागात व पालघर येथे सर्व ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिलेला आहे.
तर चार तारखेनंतर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच नाशिक पुणे व कोल्हापूरच्या घाट विभागात ठिकाणी खूप जोरदार म्हणजे ११६ ते २००४ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या संपूर्ण भागासाठी यलो अलर्ट दिलेला आहे.
पुणे व परिसरातील पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे तसेच घाट विभागात ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत दुधात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट व्यवसायासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यानंतर पाच ते नऊ ऑगस्ट पर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे.