मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather update: विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट

Maharashtra weather update: विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 21, 2023 06:57 AM IST

Maharashtra weather update : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे विदर्भ वगळता राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात आज काही जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशारा देण्यात आला आहे.

 Rain Update
Rain Update (HT)

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे आज विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही जिल्ह्यात ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच राज्यात उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे आज विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही जिल्ह्यात ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच राज्यात उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

 

Sharad Pawar : 'EDच्या भीतीनं काही लोकांनी पक्ष सोडला', शरद पवारांचा अजित पवारांवर टोला

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे गेले आहे. त्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूरला ऑरेंज तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ. अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.

Crime: लिव्ह इन पार्टनरचा सेक्ससाठी नकार; संतापलेल्या तरुणाचा महिलेवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला

राज्यात पुढील ५ दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भ भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे.

रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत वध्र्यात १४८ मिमीची नोंद झाली आहे. त्या खालोखाल गडचिरोलीत १२५.४, चंद्रपुरात ४२, नागपुरात २४, बुलडाण्यात १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

WhatsApp channel