Maharashtra Weather Update : राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आज रविवारी, मुंबई, ठाणे, पालघर तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह साताऱ्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील काही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही क्षेत्र आता वायव्य आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्रांमध्ये रूपांतरित झाले आहे . त्यामुळे पुढील काही दिवस कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज व उद्या पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तसेच नाशिक पुणे सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात तर कोकणातील सर्व जिल्ह्यात त्याचप्रमाणे नाशिक व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने त्या सर्व ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज मराठवाडा व विदर्भात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तर उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे सुद्धा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरासाठी आजपासून ९ सप्टेंबर पर्यंत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट क्षेत्रामध्ये उद्या तारीख ८ व परवा तारीख 9 सप्टेंबर रोजी खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या ९ सप्टेंबर तर आज ८ सप्टेंबर व १० सप्टेंबर रोजी घाटात जोरदार पाऊस अपेक्षित असल्याने त्या दिवशी सुद्धा घाट क्षेत्रासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.