Maharashtra Weather : बीड मुसळधार पाऊस, वीज पडून एकाचा मृत्यू, एकाच कुटूंबातील ३ गंभीर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather : बीड मुसळधार पाऊस, वीज पडून एकाचा मृत्यू, एकाच कुटूंबातील ३ गंभीर

Maharashtra Weather : बीड मुसळधार पाऊस, वीज पडून एकाचा मृत्यू, एकाच कुटूंबातील ३ गंभीर

Jun 14, 2024 09:14 PM IST

Maharashtra Weather Update : बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी वीज अंगावर पडून जिल्ह्यात एकाच मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.

बीडमध्ये वीज पडून एकाच मृत्यू
बीडमध्ये वीज पडून एकाच मृत्यू

Maharashtra weather Update : विदर्भ व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी वीज अंगावर पडून जिल्ह्यात एकाच मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. ही घटना वैजापूर तालुक्यातील शिवराई शिवारात शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. भागवत काशिनाथ डीके (वय ३२, रा. शिवराई) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनवणे आपल्या कुटूंबासह शिवराई शिवारात जमिनीची मशागत करताना दुपारच्या सुमारास पाऊस झाला. पाऊस आल्यानंतर सर्वजण मोकळ्या जागेत उभे राहिले. होते. दरम्यान अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले चौघांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, भागवत यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिघांवर वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

बीड शहराजवळील पिंपळनेर परिसरात जोरदार सगळीकडे पाणीच पाणी झाले. या पावसामुळे मनकर्णिका नदीला पाणी आले आहे.

मुंबईत पावसामुळे अनेक भागांत वाहतूक कोंडी –

मुंबईत शुक्रवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. मात्र, या पावसामुळे शहरातील अनेक भागात वाहतुकीची कोंडी झाल्याचे समोर आले. वाहतूक कोंडीमुळे सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ झाली. यावर संतापलेल्या मुंबईकरांनी सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक नागरिकांनी प्रमुख जंक्शन्सवर सिग्नल सुरू नसल्याच्या तक्रारी केल्या. तर, काहींनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर वाहतूक हाताळण्यासाठी वाहतूक पोलीस नाहीत. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सकाळच्या वेळेत होणाऱ्या गर्दीमुळे २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी अडकून पडल्याची तक्रार मुंबईकरांनी केली आहे.

राज्यात पुणे, मुंबईसह या जिल्ह्यात तूफान बरसणार! 

राज्यात आज कोकण, गोवा, मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर, सांगली, सोलापूर, व सातारा जिल्ह्यात विजांचा कडकडाट अन‌् वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मॉन्सून पोचला आहे. विदर्भातील काही भागात अद्याप मॉन्सून पोहचला नाही. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, कोकणातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर