Maharashtra Weather Update : राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. आज कोकण, मध्य माहाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर पालघर, ठाणे, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोलीं, नांदेड व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात मध्यम ते हलका असा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही क्षेत्र आता वायव्य आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्रांमध्ये रूपांतरित झाले आहे . त्यामुळे पुढील काही दिवस कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने त्या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तसेच नाशिक पुणे सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात तर कोकणातील सर्व जिल्ह्यात त्याचप्रमाणे नाशिक व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आज अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. राज्यात काही जिल्ह्यात पावसाने दांडी मारली असल्याने काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचे वारे सक्रिय झाल्यामुळे, पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.