Maharashtra Weather Update : सप्टेंबर महिन्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. मराठवाडा विदर्भात काही जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. हवामान विभागाने आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावतीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथे आज अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, जळगाव आणि सांभाजीनगर येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या महितीनुयार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य बंगालच्या उपसागरावरून वायव्य अरबी समुद्रात आहे. तर ठळक कमी दाबाचे क्षेत्र हे पश्चिम बंगाल मध्ये व लगच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर आहे. आज कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज अमरावती या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथे रेड अलर्ट दिला आहे. तर जळगाव, संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजांचा कडकडाट व जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
रायगड, रत्नागिरी व सिंधुडरउग या जिल्ह्यात तर पुणे, सातारा व घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून पुण्यात रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. पानशेत धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेघगर्जना व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगणे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. आज विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील काही जिल्हे तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाच्या एक ते दोन सरी पडण्याची शक्यता आहे. आज व उद्या ३ सप्टेंबर रोजी घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.