मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात पूढील दोन दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना दिला हवामान विभागाने यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पूढील दोन दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना दिला हवामान विभागाने यलो अलर्ट

Jun 15, 2024 06:27 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात मॉन्सून पोहोचला आहे. दरम्यान, काही भागाला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यात पूढील दोन दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना दिला हवामान विभागाने यलो अलर्ट
राज्यात पूढील दोन दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना दिला हवामान विभागाने यलो अलर्ट (HT)

Maharashtra Weather Update :राज्यात पुढील काही दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात मॉन्सून पोहोचला आहे. दरम्यान, काही भागाला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात शनिवार पासून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात देखील काही भागात ऊन तर काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘विधानसभेआधी पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, नाहीतर...; बीडमध्ये झळकले बॅनर, भाजपची डोकेदुखी वाढणार?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मॉन्सून हा जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोचलेला आहे. मॉन्सूनने बुधवारी राज्यातील काही भागात प्रगती केली. पण दोन दिवसांमध्ये मॉन्सून पुढे गेलेला नाही. पुढील दोन दिवसांत नैऋत्य मौसमी वाऱ्याची वाटचाल पुढे होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

मॉन्सूनने मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. सध्या नैऋत्य मौसमी वारे ही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, मलकानगरी व विजयानगरम या भागातच आहे. तर पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये मॉन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात प्रगती करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

G7 Summit: पंतप्रधान मोदींनी जी-७ परिषदेला केलं संबोधित, AI वर महत्वपूर्ण भाष्य, वाचा भाषणातील ठळक मुद्दे

आज १५ जून रोजी नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा कायम असून त्याची येत्या चार पाच दिवसात महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश किनारपट्टी व वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, पश्चिम बंगालमधील गंगेच्या खोऱ्याचा काही भाग तर पश्चिम बंगाल मधील उप हिमालयीन पर्वत रांगाचा उर्वरित भाग, उप हिमालयन पर्वत रांगांचा उर्वरित भाग आणि बिहारच्या काही भागात वाटचाल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

आज कोकणात बहुतांश मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत, अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार

आज १५ जूनला पूर्व विदर्भ वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तर १६ तारखेला कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच १७ व १८ तारखेला कोकणात रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर १८ तारखेला सातारा जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने त्या ठिकाणी सुद्धा यलो अलर्ट देण्यात आला आहे. १७ तारखेला तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १८ तारखेला विदर्भातील सर्व जिल्हे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा जिल्ह्यात मेघ गर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून पुढे ३० तारखेपर्यंत पावसाच्या एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर