Maharashtra Weather Update : राज्यात मॉन्सूनसर्व दूर पोहोचला आहे. दक्षिण गुजरातवर हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली असल्याने राज्याच्या व केरळच्या किनारपट्टीवर हवेची द्रोणीय रेषा निर्माण झाली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पूर्वमोसमी पावसासारखा मेघगर्जना, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज तर विदर्भ भातील बहुतांश जिल्ह्यांना तर मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मौसमी वाऱ्याची उत्तरी सीमा कायम असून पुढील तीन ते चार दिवसांत उत्तरी अरबी समुद्र, गुजरात व मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड व बिहारच्या उर्वरित भागात, तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात वाटचाल होण्यास वातावरण अनुकूल आहे.
आज दिनांक २५ जून रोजी कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र विदर्भात बऱ्याच ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज बुलढाणा, अकोला, अमरावती, सिंधुदुर्ग व गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेघगर्जना व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
पूर्व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र कोकणातील बहुतांश जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेघगर्जना व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात व नंदुरबार, धुळे नाशिक या जिल्ह्यात वीजांचा कडकडाट ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
मुंबई, पालघर, ठाणे येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. दिनांक २६ जून रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, तर दिनांक २७ व २८ जून रोजी रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दिनांक २६ जून रोजी विदर्भात वीजांचा कडकडाट, वादळी वारे तसेच ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे व कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २७ जून रोजी पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील अमरावती, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेघगर्जना व ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर दिनांक २८ जून रोजी पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर वाशिम, यवतमाळ, अमरावती, जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किमी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह मेघगर्जना व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे व परिसरात आज व उद्या आकाश सामान्यत: ढगाळ राहून वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात व काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या