Maharashtra Weather Update : राज्यात या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सोमवार पासून पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा, कोकण व मध्य माहाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना फटका बसणार आहे,
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण म्यानमार व बंगालच्या खाडीत वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून त्याची वाटचाल राज्याच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे आज पासून पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. आज पासून पश्चिम राजस्थान व कच्छ या भागातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीसाठी वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे कोकण, गोव्यात, तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ, मराठवाडा येथील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि २४) रायगड, परभणी, हिंगोली, नांदेड तर २५ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, पुणे व २६ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात दक्षिण महाराष्ट्रातील व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच औरंगाबाद, जालना, यवतमाळ, गडचिरोली वगळतात उर्वरित जिल्ह्यात व मराठवाड्यात, संपूर्ण विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २३ सप्टेंबर रोजी रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली येथे मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील राज्यातील उर्वरित जिल्ह्यात मेघ गर्जना वादळी वाऱ्यासह ३० ते ४० किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान बहुतांश जिल्ह्यात मेघ गर्जना व विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे व परिसरात आज उद्या आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी व संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.