Maharashtra Weather Update : राज्यावर अस्मानी संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; IMD नं दिला 'हा' इशारा-maharashtra weather update heavy rain alert in most of the city of tate chance of heavy rain with strong winds imd alert ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यावर अस्मानी संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; IMD नं दिला 'हा' इशारा

Maharashtra Weather Update : राज्यावर अस्मानी संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; IMD नं दिला 'हा' इशारा

Aug 19, 2024 06:53 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. रविवारी पुण्यासह अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दारम्यान, आज देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यटा हवमान विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Monsoon Update : राज्यावर अस्मानी संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; IMD नं दिला 'हा' इशारा
Maharashtra Monsoon Update : राज्यावर अस्मानी संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; IMD नं दिला 'हा' इशारा (AP)

Maharashtra Weather Update : राज्यात रविवारी वादळी वाऱ्यासह मुळसाधार पाऊस झाला. पुण्यात ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांची त्रेधा उडाली होती. दरम्यान, आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. आज पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड व विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचा पट्टा दक्षिण बांगलादेश व लगतच्या भागावर स्थिर आहे. उद्यापर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, त्याची वाटचाल नॉर्थ नॉर्थ वेस्ट डायरेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजची हवामानाची परिस्थिती लक्षात येतात पुढील तीन ते चार दिवस पालघर ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये तुरळक ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मराठवाड्यात जोरदार बरसणार

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट आलेला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्याला आजही यलो अलर्ट

पुणे आणि परिसरासाठी आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दिनांक २० ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान आकाश सामान्य ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे.