Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेची लाट आली आहे. प्रामुख्याने विदर्भ, मारठवडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. विदर्भातील जिल्ह्याचे तापमान हे ४१ डिग्री सेल्सिअसच्या पुढे केले आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, धुळे, जळगाव, परभणी हिंगोली व नांदेड येथे आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात अलायी आहे. रविवारी राज्यात अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये ४६ तर अकोला जिल्ह्यात ४५. ६ डिग्री सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल आज बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य मध्य व ईशान्य भागात झाली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्र पुढील पाच ते सात दिवस तर मराठवाडा व विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मराठवाडा व विदर्भामध्ये मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये तर पुढील चार दिवस विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली सोलापूर, लातूर, धाराशिव, अमरावती येथे आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर येथे पुढील चार दिवस व यवतमाळ येथे आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे महाराष्ट्र परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगळ राहण्याची शक्यता आहे. आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात रविवारी ३५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मुंबईत देखील मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात पुढील २४ तासांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात अलायी आहे. येथे आकाश अंशतः ढगाळ राहून कमाल आणि किमान तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुणे ३५, मुंबई ३४.३, सांताक्रूज ३४.४, अलिबाग ३३, रत्नागिरी ३३, पणजी ३४.३, डहाणू ३५.९, उस्मानाबाद ३९.६, औरंगाबाद ४१.८, परभणी ४४, नांदेड ४३.६, बीड ४२, अकोला ४५.२, अमरावती ४४.२, बुलढाणा ३८.८, ब्रम्हपुरी ४५, चंद्रपुर ४३.२, गोंदिया ४४.४, नागपुर ४२.४, वाशिम ४३.४, वर्धा ४४.१, यवतमाळ ४६.
संबंधित बातम्या