मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट! हवामान विभागाने दिला 'हा' इशारा, राज्यात पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट! हवामान विभागाने दिला 'हा' इशारा, राज्यात पावसाचा इशारा

May 21, 2024 06:53 AM IST

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update: राज्याला सोमवारी मुसळधार पावसाने झोपडले. पुणे शहर, बारामती, इंदापूर या ठिकाणी काही तास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर ओढ्या नाल्यांना पुर आला होता. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे २५ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या तर एक नागरिक झाड पडून जखमी झाला आहे. दरम्यान, राज्यात आज देखील वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि पासवाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, कोकणातील, ठाणे, मुंबई, रायगड व पालघर येथे आज उष्ण व दमट हवमान राहणार असून या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र पश्चिम मराठवाडा व पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात वीजांचा कडकडाट, ४० ते ५० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील खालच्या स्थरातील द्रोणीय रेषा खालच्या वायव्य उत्तर प्रदेश पासून पश्चिम विदर्भापर्यंत जात आहे. यामुळे संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक २१ मे रोजी कोकणातील मुंबई, पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील औरंगाबाद व पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच तशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Fake Voting : उत्तर प्रदेशमध्ये बोगस मतदानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ; २५ मे रोजी होणार फेरमतदान

कोकणातील ठाणे मुंबई रायगड व पालघर येथे आज उष्ण व दमट हवमान राहणार असून या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र पश्चिम मराठवाडा व पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात वीजांचा कडकडाट, ४० ते ५० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात ठाणे व रायगड येथे उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. २२ व २३ मे रोजी विदर्भात बहुतेक ठिकाणी तर २२ मे रोजी कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजांचा कडकडाट वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २२ ते २५ मे रोजी अकोला येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Thackeray Vs BJP : कुलाब्यात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, नार्वेकरांच्या विरोधात घोषणाबाजी

पुण्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता

पुणे व परिसरात आज व उद्या आकाश मुख्यत: निरभ्र राहून सकाळी, दुपारी, संध्याकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच वीजांचा कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन-तीन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

राज्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. या थिंकणी ४३.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४