मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather update: घराबाहेर पडण्याआधी विचार करा; उष्णतेच्या लाटेने फोडला घाम! 'या' जिल्ह्यात हीट वेव्ह अलर्ट

Maharashtra Weather update: घराबाहेर पडण्याआधी विचार करा; उष्णतेच्या लाटेने फोडला घाम! 'या' जिल्ह्यात हीट वेव्ह अलर्ट

May 31, 2024 06:19 AM IST

Maharashtra Weather update: देशात केरळसह काही राज्यात मौसमी पाऊस दाखल झाला आहे. राज्यात १० जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पण, त्या आधी राज्यात अनेक जिल्हे उष्णतेने होरपळून निघाले आहे.

राज्यात १० जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पण, त्या आधी राज्यात अनेक जिल्हे उष्णतेने होरपळून निघाले आहे.
राज्यात १० जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पण, त्या आधी राज्यात अनेक जिल्हे उष्णतेने होरपळून निघाले आहे.

Maharashtra Weather update: देशात केरळसह काही राज्यात मौसमी पाऊस दाखल झाला आहे. राज्यात १० जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पण, त्या आधी राज्यात अनेक जिल्हे उष्णतेने होरपळून निघाले आहे. आज विदर्भात काही जिल्ह्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रामुख्याने आज व उद्या विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे आज ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर ३१ ते १ जून पर्यंत कोकणात, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Update : बिहारमध्ये उष्णतेचा कहर! ३० तासात उष्माघाताने २१ जणांचा मृत्यू, पारा ४८ अंश पार

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकणात आज व उद्या तर एक जून पासून संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस ३१ ते १ जून पर्यंत कोकणात, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे दोन व तीन जून रोजी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

आज व उद्या विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे आज ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. १ ते ३ जून रोजी भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर तर यवतमाळ येथे १ ते २ जून रोजी तर वर्धा येथे २ जून रोजी मेघ गर्जना वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा ताशी ५० किलोमीटर वेगाच्या वादळीवाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Pm Narendra Modi : “मोदींनी निवडणूक भाषणात ४२१ वेळी मंदिराचं तर ७५८ वेळा स्वत:चं नाव घेतलं पण.. ”, काँग्रेसचा हल्लाबोल

पुण्यात हवामान अंशत: ढगाळ

पुणे शहर व परिसर आज पासून पुढील दोन ते तीन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी व संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. व त्यानंतर पूढी दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. व ३ ते ५ जून दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहून मेघ गर्जनेसह वीजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे .

केरळात मॉन्सून दाखल

नैऋत्य मौसमी पाऊस गुरुवारी (दि ३०) केरळमध्ये दाखल झाला आहे. तसेच नैऋत्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग पश्चिम मध्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा बहुतांश भाग, केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तामिळनाडूमधील काही भाग, मालदीव व कमोरीयनचा उर्वरित भाग, ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग, ईशान्य भारतातील बहुतांश भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस आज दाखल झालेला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग