Maharashtra Weather Update : कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस तर विदर्भात आज उद्या तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणामध्ये सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रात, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यात, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, उत्तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट असा ४० ते ५० किमी वेगाच्या वाऱ्याने काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला जिल्ह्यात ठिकाणी आज पासून पुढील पाच दिवस उष्णतेचे लाट येण्याची शक्यता आहे. आज व उद्या मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अमरावती, चंद्रपूर तर आज नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
दक्षिण कोकणात काही जिल्ह्यात पुढील पाच दिवस मेघ गर्जना, वादळी वारे तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मराठवाड्यातील परभणी बीड व हिंगोली येथे मेघ गर्जना, वादळी वारे आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात आज आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी तसेच संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ व २५ मे रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहुल दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २७ मे रोजी आकाश मुख्यता निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने मालदीव आणि कामोरियन भाग, दक्षिण मांगाचा उपसागर अंदमान आणि निकोबार बेटांचा उर्वरित भाग अंदमान समुद्र व मध्य पूर्व बंगालचा उपसागराचा काही भाग व्यापला आहे.
संबंधित बातम्या