Maharashtra Weather Update : राज्याला आज अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज धुळे, जळगाव, नाशिक. नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नंदुरबार पुणे, पुणे घाट विभाग, संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तसेच विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज २७ डिसेंबरला धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्याच्या मैदानी तसेच घाट विभागात व अहिल्यानगर येथे मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नंदुरबार, पुणे, जिल्ह्यांच्या मैदानी तसेच घाट विभागात व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, जिल्ह्यात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मेघ गर्जना वीजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज व उद्या राज्यात गारपीट व वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने घराच्या बाहेर पडणे टाळा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाचा पिकांवर आणि पशुधनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांनी काम करणे किंवा खुल्या मैदानात राहणे टाळावे, विशेषत: जर वीजांचा कडकडाट होत असेल तर सुरक्षित स्थळी थांबावे असे आवाहन पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकार यांनी केले आहे.