Maharashtra Weather Update : राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे संकट आहे. मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण १८ ते २१ पर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भातील, गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज गोंदिया, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा ते कुमोरीन एरियावर असलेली द्रोणीका रेषा आज विदर्भ ते उत्तर केरळ पर्यंत मराठवाडा व कर्नाटक वरून जात आहे. यामुळे प्रती चक्रवात आता पश्चिम मध्य आणि लगतच्या बाह्य बंगालच्या उपसागरावर आहे. याचा दूरगामी परिमाण राज्याच्या हवामानावर होणार आहे. राज्यात विदर्भात आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने विदर्भात आजपासून २१ तारखेपर्यंत काही ते बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर मराठवाड्यात १७ ते २० तारखे दरम्यान व मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात १९ तारखेला तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे. मराठवाड्यातील लातूरला आज तर नांदेड जिल्ह्यात आज आणि १९ तारखेला तसेच विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदियाला १७ ते २० तर अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात १८ ते १९ तारखेला मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात आज तर चंद्रपूरला १८ तारीख गोंदिया १८ आणि 19 अमरावती आणि नागपूर १९ तारीख व भंडार्याला २० तारखेला तुरळ ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आज आकाश आज तो उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची तर १९ ला मुख्यतः निरभ्र आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व त्यामुळे १९ तारखेला कमाल तापमानात किरकोळ घट अपेक्षित आहे १९ तारखेनंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात एकीकडे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह पुण्यात आणि इतर जिल्ह्यात ऊन वाढणार आहे. यामुळे तापमानात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या