Maharashtra Unseasonal Rain : राज्याला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले आहे. गेल्या २४ तासात अवकाळीमुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये ५ जणांना जीव गमवावा लागला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गेल्या तीन दिवसापासून राज्यात विविध भागात कुठे हलक्या स्वरूपाचा तर कुठे जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. हवमान विभागणे पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भात पावसाने कहर केला आहे. रविवारी वर्धा जिल्ह्यात मुळसाधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. येथील बाजार समितीत असणारे धान्य पावसामुळे भिजले. तर वीज कोसळल्यामुळे काही प्राण्यांचा मृत्यू झाला.
नागपूर जिल्ह्यातही गेल्या दोन ते तीन दिसवांपासून पावसाने कहर केला आहे. येथील कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत आलागोंदी येथे रविवारी दुपारच्या सुमारास एका झाडावर वीज पडून कंदुरीच्या कार्यक्रमासाठी शेतात आलेल्या दोघांच्या जागीच मृत्यू झाला. भगवंतराव भोंडवे (वय ५, रा. उदखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती), जयदेव मानोटे (वय ५५, रा. प्रभातपट्टण, जि. बैतूल, मध्य प्रदेश) असे ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे पाऊस सुरू झाल्याने शेतातील पळसाच्या झाडाखाली थांबले होते. यावेळी या फडसाच्या झाडावर वीज कोसळल्याने दोघांही जागीच मृत्यू झाला.
मराठवाड्यात नांदेड, संभाजीनगर, लातूर, हिंगोली येथे देखील अवकळी पावसाने थैमान घातले आहे. येथे शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व पावसामुळे मोठे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगरमधील पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. येथील लाडसावंगी परिसरातील अंजनडोह येथे वीज पडून तातेराव आगाजी शिनगारे तर फुलंब्री तालुक्यातील आडगाव येथे वाऱ्यामुळे उडालेल्या पत्रा लागल्याने प्रल्हाद दलसिंह बारवल हा व्यक्ति ठार झाला आहे. मारठवड्यातील अनेक जिल्ह्यात आज ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर गावातीलच दुसऱ्या घटनेत कैलास भूमी यांच्या शेतात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला.
इलेक्ट्रिक दुचाकीवर वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना साताऱ्यातील फलटण येथे शनिवारी संध्याकाळी घडली. ज्ञानेश्वर ढोले असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे तर ऋषिकेश भिसे व विक्रम धायगुडे हे दोघे जखमी झाले आहेत. दुचाकीवरून जात असतांना सरडे गावाजवळ त्यांच्या गाडीवर वीज कोसळली.
जिल्ह्यात गेली दोन दिवसांपासून बेमोसमी पावसाचा तडाखा बसत आहे. तालुक्यात रविवारी (दि.१२) सकाळी ६ वाजेच्या सुमारास भाटगाव रोड, परसूल येथे अंगण झाडत असलेल्या महिलेवर वीज कोसळून तिचा मृत्यू झाला आहे. शोभा कैलास निकम (४८, रा. भाटगाव रोड, परसूल, ता. चांदवड) असे या मृत महिलेचे नाव आहे. सकाळी ६ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. यावेळी घरासमोरील अंगण झाडत असताना शोभा निकम यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संबंधित बातम्या