Maharashtra Weather Update : राज्यात आज पासून पुढील काही दिवस पाऊस पुनरागमन करणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार २३ तारखे पासून पश्चिम राजस्थान व कच्छ या भागात भागातून नैऋत्य मौसमी वारे व पावसाच्या परतीसाठी अनुकूल वातावरण आहे. २१ व २२ सप्टेंबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यात २४ सप्टेंबर रोजी तसेच पालघर, ठाणे, रायगड येथे विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २३ व २४ सप्टेंबर रोजी जळगाव, अहमदनगर, सोलापूर तसेच २४ सप्टेंबर रोजी धुळे, पुणे, सातारा, नंदुरबार, नाशिक येथे विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात २१ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, बीड येथे वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २१ ते २३ सप्टेंबर रोजी नांदेड, २१ ते २४ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, २३ व २४ सप्टेंबर रोजी बीड तसेच २४ सप्टेंबर रोजी जालना येथे विजांचा कडकडाट मेगर्जना व सोसायट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात २२ ते २४ सप्टेंबर रोजी बहुतांश जिल्ह्यात दिवसांचा कडकडाट मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे व परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहून दुपार किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपार किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची व हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.