Maharashtra weather update : राज्यात ऐन हिवाळ्यात आता पावसाळा उष्णता आणि थंडी अनुभवावी लागणार आहे. पुढील काही दिवसांत वातावरणात मोठा बदल जाणवणार आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर हे ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाहाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे ६ तारखेनंतर अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अद्रातावाढल्याने उष्णतामान देखील वाढणार आहे. तर पाऊस झाल्यामुळे थंडीत देखील वाढणार आहे. वातावरणातील या चढ आणि उतारामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर हे ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. त्याची वाटचाल ही नॉर्थ नॉर्थ ईस्टवर होण्याची शक्यता आहे. ईस्टर्ली वाऱ्यांमुळे राज्यात विशेषता कोकण व मध्य महाराष्ट्रात साऊथ ईस्टर्ली व साऊथ साऊथ ईस्टर्ली वाऱ्यांची तीव्रता वाढेल, त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात आद्रता देखील वाढणार आहे. यामुळे गोवा व लगतच्या भागात ३ जानेवारी नंतर हलक्या पावसाची शक्यता आहे.
५ ते ८ जानेवारी या काळात तुरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात ५ जानेवारी नंतर तुरळक ठिकाणी अति हलक्या ते अती हलक्या पावसाची शक्यता आहे. सहा ते आठ जानेवारी देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात सहा जानेवारी नंतर तुरळक ठिकाणी अति हलक्या पावसाची शक्यता आहे. ५ जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होणार आहे, परंतु सहा जानेवारी नंतर पावसाची शक्यता असल्याने किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवेतील आद्रता व ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात हळूहळू घट होईल. त्यामुळे दिवसा थंडी जाणवेल.
पुण्यात आजपासून पुढील ७२ तासात आकाश मुख्यता निरभ्र राहणार आहे. तर अधून मधून आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता राहील. ५ जानेवारी नंतर ढगाळ वातावरणात वाढ होणार आहे. तसेच पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. ६ जानेवारी नंतर किमान व कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ९ जानेवारी नंतर आकाश मुख्यता निरभ्र राहील.
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत देशाच्या बहुतांश भागात सरासरीच्या ११२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाला अवकाळी पावसाचा फटका बसेल.