Maharashtra Weather: चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात होणार मोठे बदल! पुढचे तीन महीने कडाक्याची थंडी; IMD ने दिला अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather: चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात होणार मोठे बदल! पुढचे तीन महीने कडाक्याची थंडी; IMD ने दिला अलर्ट

Maharashtra Weather: चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात होणार मोठे बदल! पुढचे तीन महीने कडाक्याची थंडी; IMD ने दिला अलर्ट

Nov 27, 2024 07:45 AM IST

Maharashtra Weather update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते, असा इशारा आयएमडीने दिला आहे. हे चक्रीवादळ २७ नोव्हेंबरपर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम राज्यावर होणार असून थंडी वाढणार आहे.

 चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात होणार मोठे बदल! पुढचे तीन महीने कडाक्याची थंडी; IMD ने दिला अलर्ट
चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात होणार मोठे बदल! पुढचे तीन महीने कडाक्याची थंडी; IMD ने दिला अलर्ट

Maharashtra Weather update : उत्तर भारतात हवामान थंड झाले आहे. यामुळे राज्यात देखील थंड वारे वाहत असून तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील काही दिवसांनत तापमानात आणखी घट होणार आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन चक्रीवादळाचे रूप धारण करू शकतो, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. हे चक्रीवादळ २७ नोव्हेंबरपर्यंत आणखी तीव्र होऊन तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशात २६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पारा घसरला आहे. पुण्यात तापमानात एक ते दीड अंशांनी कमी झाले आहे. रात्रीपासून थंड वारे वाहू लागले आहेत. या सोबतच आता दिवसा देखील थंडी जाणवू लागली आहे. पहाटेच्या सुमारास तापमानात मोठी घट होत आहे. नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेऊ लागले आहेत. पुढील काही दिवसांनत थंडी आणखी वाढणार आहे. हवामान विभागाने डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सकाळी गारठा जास्त वाढला आहे. तापमान हे ८ ते १० डिग्री सेल्सियसपर्यंत आले आहे. तर काही जिल्ह्यात तापमान ११ डिग्रीसेल्सिअस पर्यंत आलं आहे.

काळजी घेण्याच हवामान विभागाचं आवाहन

राज्यात वाढती थंडीच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. डिसेंबर महिन्यात थंडी वाढणार असून या पासून बचाव करण्यासाठी स्वेटर, गरम कपड्यांचा वापर करून शरीर गरम ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तापमानात तब्बल ३ अंश सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी राज्यात मात्र, पुढचे ७ दिवस पाऊस पडणार नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे

नगरमध्ये पारा ९.२ अंशांवर

मंगळवारी नगरमध्ये राज्यात सर्वांत कमी ९.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर पुण्यात १०.८, जळगावात ११.०, सातारा १२.९, औरंगाबादेत १२.१, परभणीत १२.०, नागपुरात १२.० आणि गोंदियात १२.२, सातांक्रुजमध्ये १६.८ आणि अलिबागमध्ये १६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

 

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आज २७ अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या भागात २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. विशेषत: शहरी भागात स्थानिक पूर आणि पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

२८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी आणि रायलसीमाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. विशेषत: नैर्ऋत्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ८० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर बुधवारपर्यंत चक्रीवादळात होऊन येत्या दोन दिवसांत श्रीलंकेचा किनारा ओलांडून तामिळनाडूच्या दिशेने सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आयएमडीने मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जारी केलेल्या ताज्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, डीप डिप्रेशन त्रिंकोमालीपासून ३१० किमी आग्नेयेला, पुद्दुचेरीपासून ७१० किमी दक्षिण-आग्नेय आणि चेन्नईपासून ८०० किमी दक्षिण-आग्नेय दिशेला केंद्रित आहे. हे चक्रीवादळ उत्तर-वायव्य दिशेकडे सरकत राहील आणि २७ नोव्हेंबररोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत हे चक्रीवादळ श्रीलंकेचा किनारा ओलांडून उत्तर-वायव्य ेकडे तामिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. "

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर