Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होणार! आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता-maharashtra weather update cyclonic air condition developed over maharashtra orange and yellow alert for some district ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होणार! आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होणार! आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

Sep 27, 2024 06:49 AM IST

Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर कमी होणार आहे. शनिवार पासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आज शुक्रवारी राज्यात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाचा जोर कमी होणार! आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता
राज्यात पावसाचा जोर कमी होणार! आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता (HT_PRINT)

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. मुंबई पुण्यासह विदर्भात,कोकणात व मराठवाड्यातील काही जिल्हयात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शनिवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. असे असले तरी आज शुक्रवारी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र. विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या महितीनुसार आज नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीमुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचले जात असून या चक्रीय स्थितीपासून उत्तर बांगलादेशपर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आज उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर. उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती असून या चक्रीय स्थिती पासून कमी दाबाचा द्रोणीय पट्टा विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, गंगेय पश्चिम बंगाल मार्गे उत्तर बांगलादेशपर्यंत पसरला आहे. आज २७ सप्टेंबर रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात आज बऱ्याच व उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पालघर, धुळे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जला वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह खूप जोरदार तर छत्रपती संभाजी नगरच्या घाट विभागात खूप जोरदार तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर ठाणे रायगड रत्नागिरी जिल्हा व पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तर उद्या जळगाव बुलढाणा व विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्याला आज यलो अलर्ट

पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना विधानसभा कडकडाट व वादळी वाऱ्यासह आज जोरदार व उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पुणे व आसपासच्या परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Whats_app_banner