Maharashtra Weather Update: राज्याच्या तापमानात मोठे बदल झाले आहे. हवामानात चढ उतार होत आहे. राज्यातून थंडी पूर्णपणे गायब झाली होती. ही थंडी आता पुन्हा परतू लागली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रात सकाळी आणि रात्री गारठा वाढला आहे. तर दुपारी मात्र, उष्णतेमुळे नागरिक बेजार होत आहे. पुढील काही दिवस राज्याच्या तापमानात १ ते २ अंशाची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात १ ते २ अंश डिग्री सेल्सिअसने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसली वाढ होण्याची शक्यता आहे.
पुढील तीन दिवसांत राज्याच्या किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. तर पुढील काही दिवसांत विदर्भात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसली वाढ होण्याची शक्यता आहे व कमाल व किमान तापमान हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. तर पुण्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री गारठा पडून थंडी वाढेल व तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. ज देण्यात आलाय.महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होणार असून, त्यानंतर पुन्हा 1 ते 2 अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, किमान तापमानात पुढील तीन दिवसांमध्ये 2 ते 3 अंशांनी घट होईल आणि त्यानंतर त्यामध्ये मोठा बदल होणार नाही. विदर्भात मात्र पुढील 72 तासांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होईल आणि त्यानंतर त्यात पुन्हा वाढ होईल, असे हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तवला आहे.
राज्यात पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान ३५ अंशांच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील चंद्रपूर येथे ३६.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर सोलापूर व वर्धा जिल्ह्यात देखील कमाल तापमान ३६.९ च्यापुढे गेले आहे. तर पुण्यात तापमान ३७ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले.
बुधवारी कोकणात व मध्य महाराष्ट्रात देखी तापमान अधिक होते. तर उत्तर महाराष्ट्र व विदर्भात देखील तापमान वाढले होते. सकाळी आणि रात्री मात्र गारठा जाणवत होता. राज्यात सर्वात कमी तापमान नंदुरबार जिल्ह्यातील शाहदा येथे १२.५ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. तर मुंबईच्या कुलाबा येथे २१.१ अंश, व रत्नागिरी येथे देखील २१.१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
संबंधित बातम्या