मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather : मुंबईसह राज्यात आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम, हवामान खात्याची माहिती

Maharashtra Weather : मुंबईसह राज्यात आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम, हवामान खात्याची माहिती

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 26, 2024 04:18 PM IST

IMD Maharashtra weather update : राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान १० अंशाच्या खाली आले असून अजून किमान दोन दिवस तरी थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

maharashtra weather update
maharashtra weather update

IMD Weather Alert : महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. राज्यभर धुके पसरले आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशात थंडीची लाट सुरू आहे. अशातच आता राज्यात आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती आज (२६ जानेवारी) हवामान विभागाने दिली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान १० अंशाच्या खाली आले असून अजून किमान दोन दिवस तरी थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे आणि मुंबईमध्येही थंडीचा कडाका कायम आहे. पुण्याचे तापमान ८.६ तर मुंबईचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर आहे.

पुणे आणि नाशकात सर्वाधिक थंडी

महाराष्ट्रात सर्वाधिक थंडीचा कडाका पुणे आणि नाशिककर अनुभवत आहेत. पुणे आणि नाशिकचे तापमान ८.६ अंश सेल्सिअसवर आहे. थंडीसोबतच दाट धुक्यांमुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड हे सर्वाधिक थंड असून निफाडचे तापमान ४.५ अंश सेल्सिअस इतके खाली आहे.

मुंबईत तापमान १५ अंश सेल्सिअसवर

मुंबईत शीत लहर सुरू आहे. मुंबईत किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर आहे. शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये अधिक थंडी जाणवत आहे.

आणखी काही दिवस थंडी राहणार

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आज शुक्रवारपासून पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील आणि कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. 

तसेच पुढील दोन दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या शहरांचे तापमान १० अंशांपेक्षा अधिक घसरण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel