Maharashtra weather update: राज्यात दोन दिवसांपासूंन अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पवसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. बुधवारी पुण्यात आणि परिसरात पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, आज देखील राज्यात विंड इंटरॅक्शनमुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी हलक्या ते अति हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सोबतच वातावरणात तब्बल ४ ते ५ अंशांनी घट होणार असल्याने थंडी देखील वाढणार आहे. दरम्यान, ११ तारखेनंतर तापमानात हळू हळू वाढ होईल.
पश्चिमी विक्षोभ सध्या वायव्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या प्रदेशावर आहे. तसेच राज्यावर साऊथ ईस्टर्ली वाऱ्यांचा प्रभाव असून आजही विंड इंटरॅक्शनमुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी हलक्या ते अति हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्याच्या हवामानावर विंड इंटरॅक्शनचा प्रभाव कमी होऊन त्यानंतर पूर्ण राज्यात आकाश निरभ्र होऊन हवामान कोरडे राहील. ११ व १२ तारखेनंतर उत्तरेकडील वाऱ्यामुळे किमान तापमान जे सध्या सामान्य पेक्षा वाढले होते, ते ४ ते ५ डिग्री सेल्सियसली घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान पुढील काही दिवस हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज पुढील 24 तास आकाश अंशतः ढगाळ राहून तुरळलक ठिकाणी अति हलक्या पावसाची संभावना आहे. उद्या आकाश निरभ्र आकाश वेळोवेळी अंशिक ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. १२ तारखेनंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. या काळात किमान तापमानात ४ ते ५ डिग्री सेल्सियसली घट होण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान हळूहळू वाढेल पुढील दोन दिवस पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.
राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई, सातारा, अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलका ते अतिहालका पाऊस झाला. पुण्यात सकाळी हलका तर भागात जोरदार पाऊस झाला. हवामान अंदाजानुसार, पुढील २४ तासात दक्षिणेकडील किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात थंडी वाढणार आहे. तापमान शून्य अंशांच्या जवळपास पोहचण्याचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या