Maharashtra Weather update: राज्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी गरपीट होण्याचा अंदाज आहे. तसेच राज्यात तापमानात तीन ते चार डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता देखील आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे. अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर औरंगाबादला पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात तापमानात मोठी घट होऊन थंडी वाढणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या महितनुसार, कालचा पश्चिमी विक्षोभ म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्स आज अजून पुढे सरकला आहे. व तो आज ६० डिग्री पूर्व रेखांश व ३२ डिग्री उत्तर अक्षांशावर आहे. त्याचीच एक प्रभावी हवेची चक्रीय स्थिती म्हणजेच इंडयूस सायक्लोनिक सर्क्युलेशन व लगतच्या पाकिस्तानवर आहे. तसेच तीव्र सर्व स्वरूपाचे जेट्स स्ट्रीम म्हणजेच वाऱ्याचे तीव्र प्रवाह उत्तर भारतावर आहेत. त्यामुळे पुढील ४८ तास राज्यात पुणे जिल्ह्यातही हवेतील अर्जदाता थोडीशी वाढणार आहे.
आज आकाश मुख्यत: निरभ्र राहून वेळोवेळो आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून पुढील ४८ तास पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. पण जसजसे आकाश निरभ्र होऊ लागेल म्हणजेच उद्या सकाळपासून ८ फेब्रुवारी पर्यंत किमान तापमान थोडीशी घट होईल. ९ तारखेनंतर राज्याच्या पूर्व मध्य भागात आर्द्रता येत असल्यामुळे एक-दोन दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी अंशत: राहण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात उद्यापासून तीन-चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे आजपासून पुढील तीन-चार दिवस किमान तापमानात अंदाजे चार डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. ९ फेब्रुवारीनंतर मात्र किमान तापमान हळूहळू किरकोळ वाढ म्हणजेच मार्जिनल राईस होण्याची शक्यता आहे.
हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर, उत्तर प्रदेशातही आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. यासोबतच तामिळनाडू आणि केरळच्या काही भागातही मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल. यासोबतच तामिळनाडू आणि केरळच्या काही भागातही मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल.