मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कहर सुरूच! महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती काय ? आयएमडीने दिला हा अलर्ट

Maharashtra Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कहर सुरूच! महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती काय ? आयएमडीने दिला हा अलर्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 16, 2024 07:25 AM IST

Maharashtra Weather Update : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप सुरूच आहे. राजधानी दिल्लीत तापमानात विक्रीम घट झाली आहे. राज्यात देखील पुढील काही दिवस थंडीत वाढ होणार आहे. सध्या उन आणि थंडी असे दोन्ही प्रकारच्या वातावरणाची अनुभूती नागरीक घेत आहेत.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप सुरूच आहे. राजधानी दिल्लीत तापमानात विक्रीम घट झाली आहे. राज्यात देखील पुढील काही दिवस थंडीत वाढ होणार आहे. सध्या उन आणि थंडी असे दोन्ही प्रकारच्या वातावरणाची अनुभूती नागरीक घेत आहेत. राज्यात पुढील काही दिवस कमाल तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद! वाचा

उत्तर भरात थंडीची लहर आली आहे. थंडीमुळे आणि धुक्यामुळे जणजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिमाण विमान सेवा आणि रेल्वे सेवेवर झाला आहे. विमाणांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर काही विमाने वळवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत सलग चौथ्या दिवशी किमान पारा चार अंशांच्या खाली राहिला. तर दिल्लीच्या सफदरजंग येथे सोमवारी दिवसाचे किमान तापमान ३.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे या हंगामातील सर्वात थंड तापमान होते. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागात थंडीची लाटही येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

DGCA New SOP: विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी.. उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना करणार Whatsapp मेसेज

महाराष्ट्रात असे राहील हवामान

पश्चिमी हिमालयावर पश्चिमी विक्षोभाचा परिणाम राहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यावर कोणतीही वेदर सिस्टिम कार्यकरत नाही. यामुळे हवामान कोरडे राहणार असून आकाश निरभ्र राहील. पुढील आठवडण्यात राज्यात किमान तापमानात तीन ते चार डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात फारसा बसल होणार नाही.

Lohri 2024 : देशभरात लोहरीचा आनंद! विविध पद्धतीने साजरा झाला कापणीचा सण; पाहा फोटो

पुण्यात पुढील ४८ तासात आकाश निरभ्र राहून पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. १८ तारखेला आकाश मुख्यतः निरभ्र राहून अधून मधून आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

उत्तर भारत गारठला

दिल्लीत सकाळी आणि रात्री कडाक्याची थंडी असते. निरभ्र आकाशामुळे रात्रीच्या तापमानात झपाट्याने घट होत आहे. सोमवारी दिवसभर उन्हामुळे तापमानात झपाट्याने वाढ झाली. सफदरजंग येथे दिवसाचे कमाल तापमान १९.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे या हंगामातील सर्वोच्च आहे. येथील आर्द्रतेचे प्रमाण १००ते ४३ टक्क्यांपर्यंत होते.

WhatsApp channel