Maharashtra Weather Update : राज्यात नवीन वर्षात थंडी आणि पाऊस एकाच ऋतुमध्ये नागरिकांना अभुवावा लागणार आहे. उत्तरेकडून येणारया थंड वरयामुळे राज्यात थंडी वाढली आहे. तर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. कोकण गोव्यात पुढील पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार एक कमी दाबाची द्रोणिका रेषा दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत स्थित आहे. त्यामुळे उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर कोकण गोव्यात पुढील पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील २४ तासात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर तीन ते चार दिवस तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील धुळे व जळगाव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना, विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती व नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाटासह गारा पडण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व आसपासच्या परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची व हलक्या ते अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
३१ डिसेंबर पासून पुढील तीन ते चार दिवस आकाश मुख्यता निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या म्हणजेच 30 डिसेंबरला दिल्लीत दाट धुके पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान किमान तापमान ९ अंश तर कमाल तापमान १७ अंश नोंदवले जाऊ शकते. अशा तऱ्हेने हवामान खात्याने उद्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
यानंतर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२५ रोजी धुक्याचे वातावरण राहू शकते. या दोन्ही दिवशी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान किमान तापमान ७ ते ८ अंश तर कमाल तापमान १७ ते १८ अंश नोंदवले जाऊ शकते. हवामान खात्याने या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
आयएमडीच्या ताज्या अपडेटनुसार २, ३ आणि ४ जानेवारीला धुके असेल. पण त्यासाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. या दरम्यान तापमानात एक ते दोन अंशांची वाढ देखील होऊ शकते. २ जानेवारीला ९ अंश, ३ जानेवारीला १० अंश आणि ४ जानेवारीला ११ अंश तापमानाची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कमाल तापमान १९ ते २० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या