Maharashtra Weather update : राज्यावर वेटर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात मोठा बदल अनुभवायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडीची लाट येणार असून मोठ्या प्रमाणात तापमानात घट होणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात थंडीची लाट येणार असून मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ मराठवाड्यात तापमानात घट होणार आहे. उत्तर भारतासह राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली असल्याने उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने तापमानात घटन होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार उत्तर भारताच्या काही भागांमध्ये, मध्य भारताच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, जळगावसह मुंबईमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. देशासह राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसात कोकणात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईतील तापमानात देखील कमालीची घट पाहायला मिळत आहे.
सध्या एका पाठोपाठ एक पश्चिमी विक्षोभ वायव्य भारताला प्रभावित करत आहेत. एक पश्चिमी विक्षोभ उद्यापासून हिमालयाच्या पश्चिम भागाला प्रभावित करणार आहे. वाऱ्याची एक चक्रीय स्थिती मध्य पाकिस्तान व लगतच्या राजस्थानवर तयार झालेली आहे. तीव्र वाऱ्यांसोबत एक जेट स्ट्रीम उत्तर भारतावर आहे. तसेच आणखी एक पश्चिमी विक्षोभ तीन तारखेपासून वायव्य भारतावर परिणाम करणार आहे. यामुळे तीव्र थंड वारे या भागावर राहणार आहेत. व ते आपल्या राज्यातील उत्तर मध्य भागात व पुणे आणि परिसरात पोहोचतील. त्यामुळे ३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तीन फेब्रुवारीच्या दुपारनंतर चार तारखेपर्यंत वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे किमान तापमानात एक ते दोन दिवस बदल होणार नाही. ५ फेब्रुवारी नंतर आकाश निरभ्र राहून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये तसेच पुणे व परिसरात पुढील चार-पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे, एक तीन व चार फेब्रुवारीला वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येथे ७२ तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात किमान तापमानात ३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत तीन डिग्री सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर कमल तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे. पाच तारखेनंतर पुन्हा उत्तर वाऱ्यांबरोबर किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आजपासून राज्यात गारठा वाढणार आहे. त्यानंतर तापमानात एक ते दोन अंशांना वाढ होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र थंड हवामान कायम राहील.
संबंधित बातम्या