Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात अनेक चढ उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात पाऊस आणि थंडी असे वातावरण होते. त्यानंतर राज्यातून पाऊस आणि थंडी काही दिवसांसाठी गायब झाली होती. दरम्यान, गायब झालेली थंडीने पुनरागमन केलं असून आता थंडी सह उष्णता देखील वाढली आहे. राज्यात सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी उष्णतेचा अनुभव नागरिक घेत आहे. पुढील काही दिवस राज्यात असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात पुढील दोन ते तीन दिवस फारसा बदल होणार नाही. पुणे व परिसरात आज आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात उत्तरेकडील वाऱ्यामुळे गारठा वाढायला सुरुवात झाली आहे. राज्यात थंडी वाढली आहे. राज्यात अनेक शहरातील तापमान कमी झालं आहे. पुण्यात शुक्रवारी किमान तापमान ९.६ डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं तर अहमदनगर जिल्ह्यात ७.७ डिग्री सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं. पुढील काही दिवसांत थंडी वाढणार असून तापमान १ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात विदर्भात देखील थंडीचा कडाका कायम आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात १० अंशांच्या खाली तापमान गेलं आहे. शनिवारी यवतमाळ जिल्ह्यात ७.६ तर सोलापूर, सांगली, गोंदिया आणि जिल्ह्यात किमान तापमान ८ अंशांवर गेलं होतं. उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला असून कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले आहे. हे कोरडे वारे राज्याच्या दिशेनेही वाहत असून यामुळे आकाश निरभ्र राहून सकाळी गारठा व दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे.
संबंधित बातम्या