Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज

Jan 30, 2025 08:03 AM IST

Maharashtra IMD weather forecast: राज्याच्या हवामानात मोठे बदल होत आहे. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यात आता हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्ततवली आहे.

राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज
राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra IMD weather forecast: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहे. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यात आता हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील महिन्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बाबतचा इशारा आयएमडीने जारी केला आहे. फेब्रुवारीची सुरुवालीला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळी वगळता दिवसभर उष्ण हवामान असतं. पुण्यात देखील हीच परिस्थिती आहे. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहाटेच्या वेळी विरळ धुके पडत असून दिवसभर कडक ऊन पडत आहे. दरम्यान, शनिवारनंतर राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने तसेच उत्तरेत पश्चिम चक्रवात सक्रिय झाल्याने उत्तर मराठवाड्यात २ व ३ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे .दरम्यान उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार असून काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर तापमानातील अनेक बदल होणार आहे. उष्णता वाढणार आहे. तसेच सकाळी व रात्री थंडीत वाढ होणार आहे. कमाल व किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढला आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे. याचा परिणाम वायव्य भारतावर होणार आहे. तर उत्तर भारतातील मैदानी भागात थंडी वाढणार आहे. राज्यात मुंबई, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात तापमानात थोडा बदल झाला आहे. उष्णता वाढली आहे. दरम्यान, पाऊस पडल्यावर थंडी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात असे आहे हवामान

पुण्यात सकाळी आणि रात्री थंडी पडत आहे. सकाळी विरळ धुके पडत आहे. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून दुपारी तापमानात वाढ होणार आहे. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे.  राज्यात बुधवारी   बहुतांश ठिकाणी किमान तापमानात वाढ नोंदवणली गेली.  साधारण १४  ते २२ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान नोंदवण्यात आले. तर  कमाल तापमान देखील  ३३  ते ३९  अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर