मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather Update : विदर्भावर पुन्हा अवकाळीचे ढग! 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बरसणार; असे असेल हवामान

Maharashtra weather Update : विदर्भावर पुन्हा अवकाळीचे ढग! 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बरसणार; असे असेल हवामान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 14, 2024 06:29 AM IST

Maharashtra weather Update : राज्यावर पुन्हा अवकाळी (weather news) पावसाचे ढग दाटून आले आहे. विदर्भात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.

राज्यावर पुन्हा अवकाळी (weather news) पावसाचे ढग दाटून आले आहे. विदर्भात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे.
राज्यावर पुन्हा अवकाळी (weather news) पावसाचे ढग दाटून आले आहे. विदर्भात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. (AP)

Maharashtra weather Update : राज्यात तापमानात पुन्हा मोठा बदल होणार आहे. गायब झालेल्या अवकाळी पावसाचे ढग पुन्हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागावर दाटले आहे. विदर्भात १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे. विदर्भात अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, व यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Piyush Goyal news : पियूष गोयल यांना मुंबईतून भाजपची उमेदवारी; गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांचा पत्ता कट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयात एक थंड हवेचा झंझावात द्रोणिका रेषेच्या स्वरुपात सक्रिय आहे. एक वाऱ्याची चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थानवर निर्माण झाली आहे. तसेच एक द्रोणिका रेषा ओदिशापासून अरबी समुद्रापर्यंत तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात प्रामुख्याने विदर्भात आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. राज्याच्या अन्य भागांत कोरडे वातावरण आहे. राज्यात विदर्भ वगळता उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. विदर्भात १६ ते १९ मार्चपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. १६ मार्चला विदर्भात विशेषतः अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, व यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर १७ मार्चला अमरावती, भंडारा व नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना व वीजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ, ईशान्य मराठवाडा व लगतच्या मध्य महाराष्ट्रात वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात पुढील ७२ तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : भाजपनंतर NCP अजित पवार गटाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर, वाचा कोणाला मिळाली संधी अन् कोणाचा पत्ता कट

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आणि परिसरात पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे दीड ते दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे कमाल तापमानात पुढील पाच ते सात दिवस किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात काही जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० पार

राज्यावर एकीकडे पावसाची शक्यता असतांना काही जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला आहे. सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या जवळपास होता. विदर्भात देखील नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला आहे.

IPL_Entry_Point