Maharashtra Weather Update : राज्यावर पावसाचे संकट कायम आहे. परतीचा पाऊस लांबल्याने आज देखील राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात आज कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाडा जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पाऊस झारखंड बिहारच्या उर्वरित भागातून तसेच महाराष्ट्र छत्तीसगडच्या आणखी काही भागातून ओडिशा वेस्ट बंगाल सिक्कीमच्या काही भागातून पुढील दोन दिवसात परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. आज ठळक कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्य अरबी समुद्रावर आहे. आज रोजी विदर्भात बऱ्याच ठिकाणी कोकण गोव्यात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर उद्या कोकण गोवा विदर्भात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, कोकण विभागातील बऱ्याच जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेघगर्जना व सोसायट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र कोकण गोव्यातील बऱ्याच जिल्ह्यात तर विदर्भातील बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडात मेघगर्जना सोसाटच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे व परिसरात पुढील दोन दिवस हवामान सामान्यत: ढगाळ राहून वीजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.